फूल
फूल
दारी नटली सुंदर वेली,
नेई वाहून वारा सुगंध,
जाई जुई चंपा अबोली,
गंधात दरवळे सारा आसमंत..।
हिरवी हिरवी पाने त्याची,
इवल्या इवल्या कळ्या,
वार्यासवे डोलू लागल्या,
लाल पांढर्या गुलाबी पाकळ्या..।
भुंग्याचा चाले पिंगा,
अवती भवती फिरे फुलपाखरू,
बसे मनमोहिनी प्रत्येक मनी,
क्षणात भान विसरे वाटसरु..।
वारा वाही नवा सुगंध,
अत्तरासही त्या भूल पडे,
पाहून जगी नाव मोठे,
भरून अंगणात तो टाके सडे..।
वार्यावरती फुल ते डोले,
फांदीपासून होऊन वेगळे,
येऊन सहज कुशीत धरेच्या,
करी साजरे आनंद सोहळे..।
इवलासा तो देह फुलाचा,
सुगंधाने मनी तो वसला,
नकळत कधी व्हावा स्पर्श,
अजूनही मजला तो नाही दिसला..।
