फुलपाखरू (सहाक्षरी)
फुलपाखरू (सहाक्षरी)
1 min
11.7K
गुलाबी पिवळ्या
पाकळ्यांची फुले
फुलांचे ताटवे
वाऱ्यावर डुले
नाजुक पंख ते
फुलपाखरांचे
पाकळ्यांशी किती
साम्य साधायचे
मकरंद घेण्या
फुलावर उडे
मदमस्त होई
तसेच बागडे
निसर्ग किमया
पाहावी दुरून
त्यातच गुंतावे
मी पण हरून
