STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

फुलांची किमया

फुलांची किमया

1 min
285

शुभ्रधवल फुले फुलली अनू अंगणी

शोभा त्यांची उठून दिसे

जांभळी पिवळी फुले फुलली

जणू ती मला खोटीच भासे....


नजर ठरेना या फुलांवरी

हीच किमया झाडांची

कवडसे येतसे फुलांआडून इवलेसान

वृक्ष असती इथली खूप उंचीची....


पाईन कोन उभा दाराशी

खंबीर मुळे आपली रोवून

हिरवी ,चाॅकलेटी पाने पाही

फुलांकडे छान निरखून...,


फुलाफुलातील हा दरवळ

वार्‍यावर पसरतो मंद सुगंध

सर्वांचा आत्मा होई तृप्त

घेवून हा सुगंध मंद मंद......


सोनेरी पिवळसर कंचन फुले

बहरून येई त्याची पाकळी पाकळी

राजबिंडे दिसे हे फूल

कळी फुलून येई सकाळी सकाळी......


ओंजळीत पडता ही फुले

स्वर्गही मज फिका भासे

वंचित या सुखांना आता

नयनी साठवले मी दृश्य असे.....


Rate this content
Log in