फुलांचा संदेश
फुलांचा संदेश
1 min
394
गुलाब सांगतो --
येेता- जाता पडायचं नसतंं,
काटयात सुद्धा हसायचं असतं
रातराणी सांगते --
अंंधारात घाबरायच नसतं,
काळोखातही फुलायचं असतं.
पारिजातक सांगते --
पहाटेच्या थंंडीत कुुडकुुडायचं नसतं,
डोळे उघडत उठायचं असतं.
सदाफुली सांगते --
रुसूूू रुसून पहायचं नसतं ,
सदा हसून जगायचंं असतं.
बकुळी सांगते --
सावळ्या रंगाने हिरमुसायचंं नसतं,
गुुणांच्या गंधाने जिंकायचे असतंं.
कमळ सांगतो --
संंकटाच्या चिकलात बुडायचंं नसतं,
संंकटाला बुडवून डुुलायचं असतं.!!!.
