STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

॥ फुलांचा बहर ॥

॥ फुलांचा बहर ॥

1 min
192

फुलांचा मखमली शालू घालून धरती नटली 

क्षणात ध्यानात आले चैत्र पालवी फुटली 

अबोलीला चढली लाली

बघून तिला चाफा हसला गाली 

आसपास बकुळीचा सुगंध दरवळला 

सारंगी मनापासून बहरला 

मधमाशी त्याच्याभोवती घालू लागली पिंगा 

गुलाब फुलांचा झाडावरच रंगला दंगा 

लालगुलाबी, पिवळी फुलं 

विविध रंग बघून चकीत झाले मुलं 

मनात त्यांच्या ठसले गेले निसर्ग म्हणजे देव 

आजीकडे हट्ट काजुगर भाजुन ठेव 

उन्हाची काहीली, शहाळ्याचे पाणी घटाघटा पिऊ 

आजोबांबरोबर अंगणात बसून

फणसाचे गरें पोटभर खाऊ 

रानमेवा खाण्याची रीत न्यारी 

निसर्गराजा तुझी किमया भारी ॥


Rate this content
Log in