फुलाची परडी
फुलाची परडी
1 min
395
बागेत उमले
फुले ती पिवळी
किरणे त्यावर
पडली कोवळी
सुगंध श्वासात
कसा दरवळे
स्पर्श गालावर
त्याचाच तरळे
फुलाची परडी
घेतली भरून
पिवळी धमक
ती भरभरून
माझ्या स्वप्नातील
हीच होती बाग
मनातील माझ्या
घईल ती माग
