फुगेवाला (अभंग)
फुगेवाला (अभंग)
1 min
599
आला फुगेवाला I आवाज गल्लीत I
आलोच धावत I त्याच्यापाशी ॥ १ ॥
हॅलोजन हवा I भरली फुग्यात |
जाती आकाशात I उंच उंच ॥ २ ॥
काकडीचा एक | पिवळा तो फुगा |
दिसतोय उगा | तो ऐटीत ॥ ३ ॥
रंगबेरंगी ती | बागच फुग्यांची I
विकत घेण्याची I लगबग ॥ ४ ॥
वाटती ते फुगे | एकदाच दयावे |
सोबत उडावे | मनसोक्त ॥ ५ ॥