STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

3  

Priti Dabade

Others Children

फराळ

फराळ

1 min
383

शंकरपाळी तळताना

होतो खूप त्रास

एकेक तोंडात टाकताना

लागते फार खास


जिलेबी अन् गुलाबजामची

वाढते चव मुरल्यावर

मनच भरत नाही

एक दोनच खाल्ल्यावर


अनारशाची पडते

खूप छान जाळी

मन कसे त्यावर

लगेच भाळी


बालूशाही, बर्फी,बासुंदी

रसमलाई अन् खिर

पाहताक्षणी कशी

जीभ होते अधीर


बेसन, रवा, नाचणी,बुंदीचा

लाडू कसा विरघळतो तोंडात

बनतात अजून किती 

प्रकाराचे लाडू घराघरात


Rate this content
Log in