फोटो
फोटो
1 min
416
तुझा फोटो तसा नाहीच आनंदी
जरी फोटोत तू भारीच आनंदी
अदा चित्रात यंत्रातून पाठवली
जळा पेक्षा कशी तोटीच आनंदी
बरे ते चित्र थापा मारते ह्या की
तुझी वृत्ती तशी होतीच आनंदी!
व्यथा भोगायच्या असतात रडणाऱ्या !
रहा उपभोगण्यासाठीच आनंदी
व्यथेला लागतो अंधार त्यापेक्षा
असावे मुक्त आनंदीच आनंदी