फक्त माणूस व्हायचय
फक्त माणूस व्हायचय
1 min
232
नाजूक इवल्या हाताची माया
सागंते कानी माझ्या
भाबड्या मनाने जगणे शिक
जगण्या अर्थ येईल तुझ्या
नको कोणते हेवेदावे
नको मतभेदाचा डोंगर
इवल्याशा आयुष्यात तुझ्या
आपुलकीची शाल पांघर
पैसा प्रतिष्ठा सोंगे सारी
जगण्यापुरतं कमवायचंय
साधेपणाची शिदोरी जमवून
फक्त माणूस व्हायचय
