STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
165


घननीळ सावळ्याची

ओढ तृषार्त धरेला

आला पहिला पाऊस

सखा साजन भेटीला।


स्पर्श पहिल्या थेंबाचा

गंधाळली काळी माती

चिंब चिंब देह होता

गीत पाखरे ही गाती।


नवी नवेली नटली

शालू हिरवा नेसून

काय जादू अशी झाली।

झळ उन्हाची सोसून।


श्वासा गहिवर आला

फुटे अंतरीचा कोंब

गर्द महिरप ओली

न्याहाळीते प्रतिबिंब।


सुखावली सारी सृष्टी

बळीराजा आनंदला

पेरणीच्या हंगामाला

पावसाने वेग आला।


आता बरस संतत

नको धरु धीर काही

धनधान्य संपन्नता

मोल मातीचे सवाई।


Rate this content
Log in