पहिला पाऊस
पहिला पाऊस

1 min

30
आवडे मला
पहिला पाऊस
चिंबचिंब होऊन
भिजायची हौस
मृदेचा गंध
दरवळे आसमंती
होऊनी तृप्त
टळेल भ्रमंती
पावसा संगे
जुळली नाती
तेवल्या अनेक
प्रेमाच्या वाती
साक्ष प्रेमाची
पाऊस पहिला
मैत्रीला आपल्या
खरंच पावला