पहिला दिवस
पहिला दिवस
1 min
356
शाळेचा पहिला दिवस
साऱ्यांनाच वाटतो खास
नवे कपडे नवी पुस्तके
नाही वाटत कसलाच त्रास
हुरहुर बाकावर बसण्याची
ओढ असते मित्र भेटण्याची
खांद्यावर हात टाकून
वर्गात भिरभिर करण्याची
फळा खडूच आकर्षण
प्रयोग करताना निरिक्षण
सार झाल की असतच
विरंगुळ्याला शारिरीक शिक्षण
एकमेकांशिवाय जात नाही
घरातून आनलेला डबा
मित्राने केलेल्या अभ्यासावर
मात्र आपलाच ताबा
आतुरतेने वाट पाहतो कधी
वाजेल शाळेची घंटा
दप्तराच ओझ उचलून कधी
गाठतो घराचा वटा
