पेरू मानवतेचे बीज (सहाक्षरी)
पेरू मानवतेचे बीज (सहाक्षरी)
1 min
11.6K
संकट समयी
येतो जो धावून
पहावे त्याच्यात
दाता तो मानून
उपाशी कोणीही
झोपू नये कधी
घासातला घास
त्यास दयावा आधी
माणुसकीचे नाते
जपावे सर्वांनी
जे देता येईल
दान ते करोनी
ते मानवतेचे
बीज असे पेरू
सर्वांनी मिळून
मार्ग असा धरु
