पडक्या भिंती
पडक्या भिंती
1 min
353
जुन्या काळचा
चिरेबंदी वाडा
पडक्या भिंती
मातीचा सडा
पाऊलखुणाच
त्या वैभवाच्या
उरल्यात चिरा
पुराणकाळच्या
ही घराणेशाही
झालीय लूप्त
संपन्न भूतकाळ
सधनता सुप्त
मोडकळीचे घर
मातीनेच व्याप्त
उरले डोईवरचे
छप्परच फक्त
माया ममताही
नाही हो उरली
द्वेष न् मत्सराने
मने ही भरली
जीवनात आता
उरला नाही राम
फेकाल जर दाम
तरच होई काम
