पब्जी...!
पब्जी...!
1 min
28.6K
च्यायला त्या पब्जीच्या
सारख मुंडी
खाली घालाय लावतय...
नको तेंव्हा
खुर्चीत अडकून ठेवतय....
माग लागून लागून
डोक्याला झिंग आणतय..
वेळेला सारख
टिंग टिंग म्हणतंय...
आडकतय सुटतय
लपून बसतय...
आणि नको नको
त्यांच्या कडून मार खातय...
मार्कांच म्हणजे स्कोअरच
गाजर दाखवत पळवतय...
थांब म्हंटल तर नथांबताच
पुरती दमछाक करतंय...
वाटतंय कधी कधी
च्यायला नाद सोडवा जरा...
कबड्डीच आपला
मैदानी खेळ बरा....!
