पैशांचु न्यायव्यवस्था
पैशांचु न्यायव्यवस्था
विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर
पण कीव येते तिथल्या कारभारावर
तिथे होत असते गुन्हेगारास शिक्षा
पण पैश्याच्या जोरावर मिळते जामीनाची भिक्षा
गुन्हा असो कोणताही
त्याला कायद्याप्रमाणे आहे शिक्षा
पण दुर्दैवाने गुन्हा करणाऱ्याची
जेलपर्यंत जातच नाही रिक्षा
जरी न्यायव्यवस्था असली सच्ची
तरी न्यायनिवाडा होत नाही सच्चा
कारण न्याय दिला जातो पैशांवरून
न की इथल्या न्यायव्यवस्थेवरून
अशा या न्यायव्यवस्थेमुळे
सामान्य माणूस भरडला जातोय
सेलिब्रिटी, राज्यकर्ते, पैशेवाला मात्र
अनेक आरोपाखाली मोकाट फिरतोय
सांगा हो, मग कसा बसेल
सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास?
जर इथला न्याय, गुन्हा बघून नाही
तर पैशे बघून होतो सर्रास....!
