पैलवान काळ्या आईचा
पैलवान काळ्या आईचा
1 min
379
रुबाब माझ्या बाबाचा
आकाशाला छत्र करून
शेतामध्ये राबायचा
डोळीवर सुर्य आला
त्यालाही लाजवायचा
पैलवान हा काळ्या आईला
हिरवा शालू नेसवायचा
सर्जा राजाच्या जोडीने
गाजवला हा भाग सारा
तोरा माझ्या बाबाचा
भयभीत होई गाव सारा
थकला नाही थांबला नाही
मरेपर्यंत केली सेवा
रुबाब माझ्या बाबाचा
शेतामध्ये राबराब राबायचा
पैलवान हा काळ्या आईला
हिरवा शालू नेसवायचा
दुष्काळग्रस्त झाला तरी
दोरी वर नाही लटकला
कंबर खचून चालत राहिला
कष्टा पुढे त्याच्या काळ ही रडला.....
रुबाब विधाताचा.....
काळ्या आईत मिसळला...
पैलवान तो काळ्या आईचा
तिला हिरवा शालू नेसवला.....
