पावसास प्रश्न
पावसास प्रश्न
1 min
7
पावसा एक सांग..,
तुझे घर सोडून जेव्हा
येतोस खाली मुक्कामाला
तुझी आठवण गच्च दाटून
येत नसेल का रे कुणाला..?
तुझ्या विरहात विजेचं काय?
अष्टोप्रहर बरसतोस, निजेचं काय?
वाट पाहते का रे तुझीही माय ?
भिजवतोस जगाला जसं हवं तसं
पण सांग ना, तुझ्या भिजण्याचं काय?
तू यायच्या आधी तुझं आणि
तिचं होतं ना कडाक्याचं भांडण?
तू नसलास सांगत तरी..
तुझ्या वियोगाने विजेचं कडाडणं
थेट अंगावर येऊन जीवच घेणं
आणि क्षणात परत जाणं आम्ही
समजू शकतो... कारण कित्येक
पावसाळे आम्हीही पाहिलेत बरं..!
