पावसाळी मेघ असे
पावसाळी मेघ असे
1 min
28K
मेघ दाटले आकाशी
बरसल्या जल धारा
थुई थुई नाचे भुई
मोर फुलवी पिसारा ।।
झाडावरी किलबिल
रान पाखराची चाले
गात मंजूळ मंजुळ
गीत कोकीळा ही बोले ।।
धरा नेसली हिरवा
शालु मखमली नवा
रानी गोपाळ घेऊन
कृष्ण वाजवीतो पावा ।।
पावसाळी मेघ असे
चिंब भिजली धरणी
येई अवखळ वारा
निर्सगाची ही करणी ।।
ढग दाटले नभात
चमचम ते बिजली
स्वगातास ही मेघाच्या
माय धरणी सजली ।।
