पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
1 min
190
थेंब टपोरे पडती
कधी सरसर धारा येती
कधी रिमझिम सरी पडती
मुसळधार त्या कोसळती
सर सर पाऊस धारा
संगे वारा घेऊन आला
कोसळती भूवरी धारा
नदया ,ओढे भरुनी आला
मोत्यांचा पाऊस आला
थेंब टपोरे बरसून गेला
नद्या ,तलाव भरून आला
तरंग निर्माण करुनी गेला
सरी कोसळती भूवरी
आनंदाच्या येती लहरी
भेगा बुजूनी जमिनीवरी
प्रवाह सर्वत्र दिसती भारी
ही गर्द शोभे वनराई
झाडवेली न्हाऊन जाती
प्रसन्नता पाहत राही
गवताची ओली पाती
सरीवर सरी पडती
क्षणभर मागे फिरती
जलप्रवाह निर्माण करती
सृष्टीला आनंद देती
