पावसाची ओळख
पावसाची ओळख
1 min
29
लहानपणी आईने मला करून दिली ओळख पावसाची
मग सुरु झाली आईकडे माझी प्रश्नावली
कोण पाठवत पाऊस येतो तरी कसा तो खाली?
का नाही तो आणत आपल्याबरोबर चॉकलेटच्या सरी?
मध्येच म्हातारी आजी का करते आवाज आभाळात
कशी वीज चमकते आकाशात
आईने माझ्या प्रश्नांची हळुवारपणे उत्तरे दिली
अशाप्रकारे मला पावसाची ओळख झाली
