पावनाचा जीव मुरला
पावनाचा जीव मुरला
1 min
131
नटून थटून मी, आली इश्काच्या नगरीत
रस्त्यात आडवले मला
गोर अंग चोळी, नव्वार पाहूनी
पावनाचा जीव मुरला ।
कस्तूरीचा गंधात भिझले, यौवन माझे सारे
खेळला गंध हा सारा, निर्सग रमले हे सारे
काजळ वादळ मी, आली रानाच्या नगरीत
रान संगती माझ्या झूमला
गोर अंग चोळी, नव्वार पाहूनी
पावनाचा जीव मुरला ।।
कोकिळाच्या आवाजानं, मन सार रंगले
मळा सारा पाण्यानं, हिरव सार रंगले
उडत उडत मी, आली कोकिळा नगरीत
सुंदर गांव सजवला
गोर अंग चोळी, नव्वार पाहूनी
पावनाचा जीव मुरला ।।
