पावा
पावा
1 min
210
रुणझुण रुणझुण वाजे पावा
रुणझुण रुणझुण वाजे पावा
वाऱ्यासंगे झुळूझुळू वाजे पावा
खळखळ खळखळ वाहे झरा
मन माझे आनंदाने नाचू लागे
बासरीच्या तालावर डोलू लागे
अवती भोवती फिरू लागे
रुणझुण रुणझुण वाजे पावा
नाचती डोलती मयूरराजे
आकाशी पाहती मेघराजे
बरसती बरसती जलधारा
रुणझुण रुणझुण वाजे पावा
हर्षाने नाचती जलधारा
स्वागत करती पक्षीराज
सळसळ करती रानवारा
रुणझुण रुणझुण वाजे पावा
