पाऊसधारा
पाऊसधारा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आल्या आल्या पाऊसधारा
दारी थेंबा थेंबाचा पसारा
ओल्या मातीचा सुगंध सारा
आल्या आल्या पाऊसधारा
बेभान भन्नाट वारा
शहारा येई अंगाला
अलगद स्पर्श होई मनाला
आल्या आल्या पाऊसधारा
आठवणीत दंग होऊन जाई
हिरवळ दिसे दिशा दाही
इंद्रधनू नभाआड जाई
हिरवा पारवा श्रावण गारवा
आल्या आल्या पाऊसधारा
पसरे मातीचा चाहुकडे सुगंध
मनाला वेड लावे हा गंध
फुला पानावर थेंब दिसे
मन अलगद फुलती मोर पिसे
मन झाले बेभान
कडकड आवाज पडे कानावर
झाडी झुलते डुलते
मन आनंदाने फुलते
आल्या आल्या पाऊसधारा
संगे सोसाट्याचा वारा
आल्या आल्या पाऊसधारा
Sandhya jadhav
9th