पाऊस
पाऊस
1 min
283
रिमझिम झरती पाऊसधारा
वाहे मृद्गंधासह वारा
वरुण राजा जणू प्रकटला
सप्तरंगी धनू नभी उमटला
फुले पाने दवात भिजली
पाखरे हिरव्या कुरणी निजली
मयुर थुई थूई करिती नृत्य
पावसाचे असे त्यास अगत्य
शिवार भरले उभ्या पिकांनी
रस्ते भरले गर्द धुक्यांनी
कृष्णमेघ नभांगणी गरजती
क्षणात विद्युल्लता चमकती
चिंब चिंब ही झाली धरती
नद्या सागरा आली भरती
पावसा रे तू बरसत रहा
तृप्त आसमंत अन् दिशा दहा
