पाऊस
पाऊस
रिमझिम आली धार अनं थेंब टपोरे ओले l
पावसाच्या सरींनी मन चिंब चिंब झाले ll धृ ll
ढग झाले काळेभोर, भासती जणू देवाची मेंढरं l
सुखावती जीवांना येऊनी अपसूक भू -वरं ll1ll
थंड थंड गार वारा, सुखावतो मना न्यारा l
गंधानं मातीच्या सुंदर, जीव झाला हराभरा ll2ll
थेंबांनी इवल्याशा झाली बेजार पाखरं l
भिजून चिंब पावसानं हंबरती गुरंढोरं ll3ll
तप्त होती धरती अनं उन्हानं त्रासली l
धारांनी पावसाच्या जणू धन्य धन्य झाली ll4ll
थेंब पावसाचे भु -वरी आले l
मिठी देऊन धरित्रीला अनं हिरवे हिरवे झाले ll5ll
खेळात पावसाच्या मग धावून आले ऊन l
इंद्रधनु सप्तरंगी गेले मनासं मोहून ll6ll