पाऊस
पाऊस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
291
मेघ सावळा गगनी आला ।
मोद मनाला क्षणीच झाला ।।
रिमझिमती त्या अखंड धारा ।
थेंबातुन हा मोद धरेला ।।
कण कण हिरवा अंकुर फुटला ।
रंग धरेचा क्षणी बदलला ।।
वृक्षास नवा पालव आला ।
फांदीत नवीन जोश भरला ।।
फांदी वरती गाणी गातो ।
झुल्यावरी तो पक्षि डोलतो ।।
श्रावण मासी इंद्रधनूचा ।
गगनी कैसा ठसा उमटला ।।
आनंदाला उधाण आले ।
जन मोदे उत्साही झाला.... ।।
ऋतू असा तो... पावसाळा ।
नेमेच येई, आज आला.... ।।