पाऊस...
पाऊस...
रिमझिमणाऱ्या सरी येऊनी
मातीचा सुगंध दरवळावा
हिरव्यागार पाचूच्या शेतीत
सोन्यासी पर बहरवा
रानात पक्षी भिजावेत
सागरा ना लाटी ओसळव्यात
मोराने थुईथुई नाचावे
कौलार पारवा ओरडा वा
विजा कडकडीत कोसळव्यात
पाऊस बरसतच रहावा
असा थंड थंड गारवा
आनंदी भरारी घ्यावा
भिजत राहावे ओले चिंब
सरगम येऊनी बेधुंद
रिमझीम त्या सरीना
द्यावे नभी बिंब
बागेतील फुल बहरवी
इंद्रधनुष्य नी झेप घ्यावी
उंच उंच या नभात
पाखरांनी भरारी घ्यावी
बारमाही पाऊस येतच रहावा
राबता शेतकरी कष्टाळू व्हावा
भरभरून धान्य द्यावा
अशाने थांबणार आत्महत्या
हि शेतकरी जीवनाची कथा
पावसाने नेहमी गंधाळतच राहावे
पावसाने नेहमी येतच रहावे..!