STORYMIRROR

Sagar Nanaware

Others

4.8  

Sagar Nanaware

Others

पाऊस येणार कसा...?

पाऊस येणार कसा...?

1 min
28.4K


ओंझळभर पाण्यासाठी

नळ चाललेत वाहून

अंघोळीच्या नावाखाली

हत्ती निघतोय न्हाऊन

घोटभर पाण्यासाठी

कोरडा पडेल घास

पाणी पाणी करता

पण पाऊस येणार कसा ?


पाणी हेच जीवन

म्हणती सारे जीव

झाड झाड तोडताना

येत नाही का कीव

गोष्टींमध्येच दिसतील आता

कासव आणि ससा

पाणी पाणी करता

पण पाऊस येणार कसा?


प्रदूषणाच्या मदतीसाठी

धावते तुझी गाडी

झाड झाड तोडून तिथे

बांधली जातीय माडी

मंगळावरून पाणी आता

आणेल का रे नासा

पाणी पाणी करता

पण पाऊस येणार कसा?


येरे येरे पावसा आता

म्हणायला वाटते लाज

सुखसोयी आल्या पण

दुष्काळ मोडतोय माज

मानवच गुन्हेगार खरा

जीवसृष्टीच्या नाशा

पाणी पाणी करता

पण पाऊस येणार कसा?


Rate this content
Log in