पाऊस वेचताना
पाऊस वेचताना
पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर अलगद कोसळतात
तेव्हा ते मला माझ्या बालपणात घेउन जातात.
सरत्या वयान निसटून गेलेल माझ निरागस बालपण,
काही क्षण, का होईना ते मला परत देेतात.
स्वप्नांच्या मागे धावताना, पायांनी सोसलेलया चटक्यांवर,
प्रेमाचे तुषार हळूवार बरसवतात.......................💧
पावसाचे थेंब कधी कधी वय विसरायला लावतात,
कित्यक वर्ष मागे नेऊन उनाड बागडायला लावतात
आयुष्याच्या मध्यावरून बालपणात,
तर कधी उमलत्या तारूण्यात नेतात .
मनाच्या आत खोलवर दडवून ठेवलेल्या आठवणी
नव्याने जागवतात डोळे भरून गहिवरून टाकतात ...... .. ................💧
कडाडणाऱ्या वीजा, गडगडणारे ढग, काळेेेकुटट आभाळ पाहून
नकळत, आईचा पदर शोधतात.
पावसाचे थेंब डोक्यवरून, कोसावरून, ओघळत गालावर येतात,
डोळ्यातल्या अश्रूंमध्ये केव्हाच मिसळलेलेे असतात.
साऱ्या दुःखाचे मूळ नीरस आयुष्याची मरगळ झटकून
हेच थेंब मला नव्याने जगायला शिकवून गेलेले असतात....................💧3
