पाऊस पहिला आला
पाऊस पहिला आला
2 mins
27.2K
घेऊनी आले वारे मोसमी हे कृष्ण मेघांना
तृषार्त जीव आतुर झेलण्या जलधारांना
मृदगंध घेऊ दे दिर्घ श्वासांत उठी ताना
पहिल्या सरीचे अप्रूप अंतरी झरताना
थेंब उतरी घेऊनी मिठीत धुलीकणांना
ओथंबले वृक्ष पानोपानी जाग ये क्षणांना
चराचराची धांदल पसारा आवरताना
मेटाकुटीस छत आसऱ्यांचे सांवरताना
उरी ओलावा पसरे चैतन्य दाहीदिशांना
बिजली देई साथ मध्येच मेघगर्जनांना
