पाठलाग
पाठलाग
1 min
274
स्वप्नांचा पाठलाग आयुष्यभर करावा
स्वप्नपूर्ती होण्यास थोडा धीर धरावा
पाऊले टाकत रहावी मागे न वळता
खचून जाऊ नये एक अपयश कळता
स्वबळावर पुढे चालावे विश्वास बाळगून मनी
लांब रहावे दिसता खेचणारे खाली कुणी
विचार करावा पक्का मनगटात आनावा जोर
ताट मानेने जाताना पळून जाईल मनातला चोर
स्वप्नवेल बहरेल हळू इच्छा होतील पूर्ण सार्या
नव्याने पुन्हा आयुष्याची ओळख होइल खर्या
