STORYMIRROR

Monali Kirane

Others

3  

Monali Kirane

Others

पारसमणी कोकण

पारसमणी कोकण

1 min
290

भारताच्या पश्चिमेला पाचूचं लेणं,

कोकण हे तांबड्या मातीतील समृद्धीचं देणं!

आंबे, कोकम, नारळी-पोफळी,

काजूगर, सुपारी नी मुबलक मासळी!

या लंकेच्या पार्वतीला निसर्गाचा साज,

सोबत अथांग रत्नाकराची सततची गाज!

रोजच्या धावपळीच्या जीवनात इथे मिळे निवांत श्वास,

तरीही तांत्रिक प्रगतीची अजूनही कोकणला आस!


Rate this content
Log in