पारिजात गंध...
पारिजात गंध...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.8K
रम्य पहाटे अंगणात सडा
सुंदर पारिजात फुलांचा
पांढरा, केशरी रंगांचा मोहक
दरवळ चोहीकडे सुगंधाचा
इवल्याशा प्राजक्त फुलांची
देवापुढे सजे प्रसन्नतेची रास
बेधुंद करणारा घरभर गंध
चोहीकडे फुलबागेचा भास
कधी त्या नाजूक सुमनांचा
ओवून हलकासा सुंदर गजरा
माळता केसांमध्ये तो पुष्पहार
उठून दिसे सौंदर्याचा नखरा