पाणी
पाणी
1 min
26.8K
पाणी जीवन
रिमझिम श्रावण
पाणी राजस
आरसा लोभास
पाणी अंतरंग
चंचल जलरंग
पाणीच तृष्णा
व्याकुळ कृष्णा
पाणी निर्झर
अमृत अमर
पाणी थेंब
हिरवा कोंब
पाणी संततधार
आयुष्याचा आधार
पाणी सागर
मेघदूत घागर
पाणी मोहिनी
विश्वाची स्वामींनी
पाणीच श्वास
कधी ..मृत्यू पाश
पाणी हिरवाई
जननी माता आई.....
