पानगळ
पानगळ
1 min
497
पानगळ झाल्या वनात,
धुक्यात वाट हरवली,
सोनेरी पानांचे गालिचे,
पाहूनी थोडी बहकली!
पाहिला तिने कितीदा,
ऋतू वसंत बहरलेला,
भिजली माती तिची,
पाऊस जेव्हा बरसलेला!
पक्ष्यांची मंजूळ गाणी,
रोज ऐकली असतील,
पुन्हा येता बहर तरूंना,
घरटी अनेक वसतील!
ऋतू चक्र निसर्गाचे,
फिरते कालाबाधीत,
सृष्टी नियम बदलाचा,
तिलाही आहे माहित!
परी न आठवे तिजला,
पाहिल्याचे कधी कुणा,
एकलाच मार्ग तिचा,
शोधत राही पाऊलखुणा!
