पान
पान
1 min
11.8K
कळीदार कपूरी पान
नर्तकीच्या आवडीचं
जायपत्री वेलचीनं
तिनेच खुलवायचं
शेंड्याचं पान जावयाचं
फारंच मानापानाचं
चांदीचं पान बाळाचं
पक्वांनांनी सजवायचं
वडीचं पान अळूचं
चटकदार चवीचं
कुरकुरीत वडीत
सुगरणीनं रमायचं
पानाफुलांची रांगोळी
कलात्मकता नारीची
रंगकलाबूतीने सजवी
लज्जत वाढवी जेवणाची
पानांनी बनविले असे
जीवन आपुले सुंदर
सर्वांनी त्या जपावे
माया प्रेमे अवनीवर