पान
पान
1 min
356
कळीदार कपूरी पान
नर्तकीच्या आवडीचं
जायपत्री वेलचीनं
तिनेच खुलवायचं (1)
शेंड्याचं पान जावयाचं
फारच मानापानाचं
चांदीचं पान बाळाचं
पक्वानांनी सजवायचं (2)
वडीचं पान अळूचं
चटकदार चवीचं
कुरकुरीत वडीत
सुगरणीनं रमायचं (3)
पानाफुलांची रांगोळी
कलात्मकता नारीची
रंगकलाबूतीने सजवी
लज्जत वाढवी जेवणाची (4)
पानांनी बनविले असे
जीवन आपुले सुंदर
सर्वांनी त्या जपावे
माया प्रेमे अवनीवर (5)
