पाखरांची शाळा
पाखरांची शाळा
1 min
255
दारी येरे बाळा
भरली पाखरांची शाळा
तुझ घरं आहे मोठ्ठ
बघ रे त्यांचा खोपा
छोटे छोटे डोळे
छोटे छोटे कान
बाळा तू थोडे
त्यांना देशील का दान
तुझी आई तुला
भरवती वरणाचा घास
त्यांची आई त्यांना
चारती चोचितले दान
तुझ घर आहे सिमीटच
त्यांचा गवताचा खोपा
पावसाच्या धारा आल्यावर
देशील का त्यांना निवारा
