STORYMIRROR

Vaibhav More

Others

4  

Vaibhav More

Others

माझी आई

माझी आई

1 min
165

जशी चादंनी चमचमती 

तशी माझी आई ग

माझ्या जिवनाची 

ती अनमोल सावली ग


काट्याच्या या रस्त्यामध्ये 

सुळ घुसे पायामध्ये 

पायातून रक्त वाही भळाभळा 

ती बघत असे माझ्याकडे 


सुगीच्या या दिसामध्ये 

लय हंगाम माजला

या सुगीच्या दिसापायी 

रक्ताचा थेंब नाचला


तळतळत्या त्या उन्हात 

मायचा घसा दाटीला 

कोरडाच तिचा जीव

माझ्या साठी राबला 


पायात नसे वाहन तिच्या 

भाजत जाय पाय 

माझ्या शिक्षणासाठी ती 

पैसे जोडत जाय


Rate this content
Log in