नव्या दमाने लढू
नव्या दमाने लढू
1 min
223
चला गड्यांनो आपण सारे
नव्या दमाने लढू
जातीपातीचे बंधन तोडून
आपण सारे जगू
फुले सावित्रीवानी आपण
खंबीर आता बनू
महामानवांचा इतिहास वाचून
त्यांच्यासारखे घडू
झाडे लावून जगवू या त्यांना
नवीन सुष्ट्री करू
जश्या मुंग्या चालतात रांगेत
तसे शाळेत जावून बसू
डोंगर असले स्वप्नांचे उंच
नव्या दमाने चढू
सर्वधर्मातली मुलं आपण
अभिमानानं तिरंगा हाती घेऊ
