झुंजुन उठले तारे
झुंजुन उठले तारे
1 min
317
झुंजून उठले तारे
पेटून उठले वारे
या मातिवरती
रक्ताचा सडा करून
स्वातंत्र्याचे बीज उगवले सारे
पेटता पेटता या वातीत
बीज सत्याचे मळे
सत्याच्या शोधाने
भीमरावाने संविधानाचे
फोडले दोहाडे
या मातीचेच कण आपण
या मातीवरती झळकले
सत्याच्या शोधाने
हे जग आम्ही पण जिंकले
हिंदू मुस्लिम ऐक येऊन
फडकू तिरंगी झेंडे
काश्मीर आमचा आहे आणि
पाकसुद्धा आमचाच होता
भाऊ बनून राहू आता
फडकवू तिरंगी झेंडे
