STORYMIRROR

Vaibhav More

Others

3  

Vaibhav More

Others

स्त्री हा कुटुंबाचा कणा

स्त्री हा कुटुंबाचा कणा

1 min
198

लेक असली तर 

बरे चालते कुटुंबाचे चाक

स्त्री हा कुटुंबाचा कना

मग हा समाज तिला का देतो त्रास 


आई बापाची लेक ती लाडकी 

आंब्याच्या पाडासारखी वाढती 

हृदयात छेद पाडून जाते ती 

होती एकदमच घराला परकी 


रडतोस तो बाप आता 

तिच्या त्या प्रेमळ आठवणी बघून 

मायला विसावा मिळत होता 

तिचे ते काम बघून 


मुलगी परकी होणार 

आईचे हृदय रडायला लागते

जन्माचा सोन्याचा गोळा गेला 

ते बघून तिचे हृदय हलते


मुलगी सुद्धा हृदयाआड 

रडत असते 

कधी होईल भेट माझ्या आई वडिलांची 

तिचे काळीज वाट बघत असते


Rate this content
Log in