बहीण भावाचं नातं काय असतं
बहीण भावाचं नातं काय असतं
1 min
209
बहिणीच्या त्या पापणीकडे बघून
माझ्या डोळ्यातून थेंब गळत
कधी काळी जाईल ती सोडून
माझं हृदय पण हलतं
तुडुंब भरलेल्या प्रेमाच्या त्या समुद्रात
मन पण पोहतं
बहिणीच्या त्या जिव्हाळ्यात
हृदय पण भटकतं
भलतंच वाटतंया
बहिणीपासून दूर गेल्यावर
तिच्या त्या प्रेमाच्या आठवणीतून
पूर गेल्यावर
कधी भेटशील गं तू मला
हंबरून बघतो मी तुझी वाट
कधी काळी रागात बोलत होतो मी तुला
आज बघतो तुझी वाट, डोळ्यांची आस
