STORYMIRROR

Vaibhav More

Others

3  

Vaibhav More

Others

शिक्षक कसा असावा

शिक्षक कसा असावा

1 min
300

शिक्षक कसा असावा 

शिक्षक नारळापरी असावा 

जणू वरतून कडक व

आतून मधुर गोडवा असावा 


शिक्षक कसा असावा

शिक्षक एखाद्या झऱ्याप्रमाणे असावा 

जणू तो आमच्या आत्मविश्वासाचा

एक पाझर असावा 


शिक्षक कसा असावा 

शिक्षक एखाद्या मित्राप्रमाणे असावा 

आमच्या भावना समजून जणू तो 

आमच्या भावनेत पोहणारा असावा 


शिक्षक कसा असावा 

शिक्षक एखाद्या गरुडी प्रमाणे असावा 

जणू तो खूप अंतर असून सुद्धा 

आमच्यावर लक्ष ठेवणारा माय बाप असावा 


शिक्षक कसा असावा 

शिक्षक एखाद्या कुंभारापरी असावा 

शिक्षणाला व्यावसायिक रूप न देता 

ज्ञानदीप देणारा वटवृक्ष असावा 

जणू तो या देशाचा राष्ट्रनिर्माता असावा 


Rate this content
Log in