STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

पाडवा (महाराष्ट्र संस्कृती)

पाडवा (महाराष्ट्र संस्कृती)

1 min
418

सण हर्षाचा, नवं वर्षाचा,

नवउन्मेषाचा, नवं आनंदाचा,

दिग्विजयाचा, उत्साहाचा,

बांधून तोरण करु साजरा सण पाडव्याचा !!

विजयोत्सव वर्षानुवर्षे होतोय,

सत्याचा असत्यावर,

चांगल्याचा वाईटावर,

मांगल्याचा अमंगलावर,

बांधून तोरण करु साजरा सण पाडव्याचा !!

अंगण सजले रांगोळ्यानी,

घरंदार सजली पुष्पहारांनी,

स्वागत केलं पवित्रगुढीनी,

बांधून तोरण करु साजरा सण पाडव्याचा !!


Rate this content
Log in