STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others Children

4  

Sumit Sandeep Bari

Others Children

ऑनलाईन शाळेचा अनुभव

ऑनलाईन शाळेचा अनुभव

1 min
1.3K

कोठूण कसा कोरोना आला

त्याच्यामुळे शाळा बंद झाल्या,

शाळेच्या आठवणी जुन्या होऊ लागल्या

मध्येच ऑनलाईन शाळेचा उगम झाला.


पाहिले नव्हते कळतं 

काय आहे ऑनलाईन शाळा,

नंतर मग समजले मोबाइल संगणक

हीच ऑनलाईन शाळा.


डोक्यात एक विचार आला

मोबाईलद्वारे कशी होईल शाळा,

मग शिक्षकांनी समजावले 

झूम,वेबेक्सद्वारे होईल तुमची शाळा.


ऑनलाईन शाळेचा लागला मग लळा

शाळा सुरू झाल्यावर नेटवर्कचा प्रॉब्लेम आला,

नेटवर्कच्या प्रोब्लेममुळे खूप अडचणी आल्या

शाळेतील शिक्षक म्हणतात सिम तर बदला.


हे सिम ते सिम नाही वेगवान नेट

सर मॅडम म्हणतात ऑनलाईन भेट, 

या अडचणीमुळे माझी शाळा झाली नाही

आता समजले ऑनलाईन शाळा सोपी नाही.


ऑनलाईन शाळा आता कठीण वाटू लागली

शैक्षणिक नुकसानाला सुरुवात होऊ लागली,

ऑनलाईन शाळा नाही प्रत्यक्ष शाळा

कमी होऊ लागला तिच्याबद्दलचा लळा.


जो मोबाइल शाळेत नव्हता चालत

तोच मोबाईल आहे आज शाळा चालवत,

शाळा चालू असतांना वाटे घरून करावी शाळा

पण ऑनलाईन शाळेपेक्षा चांगली माझी शाळा.


Rate this content
Log in