ओले ओले ओले
ओले ओले ओले


सोसाट्याचा वारा आला
पावसाने झाले कपडे
ओले ओले ओले
ओले ओले ओले !
छत्रीही हातात राहिना
कुठेही आडोसा मिळेना
ऑफीसमधे जाऊ कशी
चिंब मी भिजून गेले झाले
ओले ओले ओले
ओले ओले ओले !
वीज वरुन कडकली
भीतीने छाती धडकली
रस्त्यामधे एकली मी
पार गारठून गेले
ओले ओले ओले
ओले ओले ओले !
जीव हा वेडापिसा झाला
सजणा तू का नाही आला
ऊब प्रेमाची तुझ्या
घेण्यासाठी मी आसुसले
ओले ओले ओले
ओले ओले ओले !