ओढ तुझ्या येण्याची
ओढ तुझ्या येण्याची
हळुवार होणारा स्पर्श तुझा खूप आवडतो मला
अलगद सरणारा गार वारा तुझा खूप आवडतो मला
प्रत्येक थेंबातला ओलावा तुझा खूप आवडतो मला
चिंब ओला करणारा सडा तुझा खूप आवडतो मला
भिजलेल्या मातीचा गंध तुझा खूप आवडतो मला
चहुकडे पसरलेली हीरवळ खूप आवडते मला
तू आलास की बहरलेली माझी मीच आवडते मला
म्हणून तुझ्या येण्याची हुरहूर सतत भासते मला